राणेचीवाडी येथे मुलांनी उभारले शेतकरी वडिलांचे स्मारक

समाजापुढे ठेवला नवा आदर्श


तळा-किशोर पितळे

तळा तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील राणेचीवाडी येथील जगदीश, जयेश,भास्कर, गोळे यांनी वडीलांचे स्मारक उभारून जन्म दात्या आ वडीलांच्या स्मृती चिरतरुण (जागृत) रहाव्यात या उद्देशाने पंचमुखी मारूती मंदिरा शेजारी काल स्मृति दिनी उभारले. यापूर्वी गेल्या वर्षी शेतकरी आदिवासी बांधवांना फावडे पिकाव,घमेले झाडू असे साहित्य वाटप करून वर्ष स्मृती दिन साजरा केला होता.मात्र यावेळी स्मारक उभारले.आजच्या काळातआई वडिलां प्रती असणारीआस्था,प्रेम,आत्मियता बदलत्या काळानुसार लोप पावत चालली आहे पैसा म्हणजे सर्वस्व समजणारे बिलंदर असतात. पण या मुलांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याचे सर्वत्र केले जात आहे.कै.नारायण गोळे हे दानशूर,प्रचंड कष्टाळू व  हाडाचे शेतकरी म्हणून परिचित होते.हलाकीचे दिवस असताना देखील अनेक संकटांना तोंड देऊन त्यांनी शेती हा पारंपरिक व्यवसाय जोपासलाआजच्या काळात माणूस आपली एक इंच जागा देखील सोडत नाही मात्र नारायण गोळे यांनी गावातील पंचमुखी मंदिरासाठी स्वतःची चार गुंठे जागा गावासाठी दान स्वरूपात दिली.त्यांची ही दानशूरवृत्ती जनसामान्यांपर्यंत पोहचावी.शेती पुरक व्यवसाय दुधाचा असल्याने म्हैस गोठा अशी कला दाखवली आहे.सदरचा पुतळा तळा येथील जे जे स्कूल आँफ आर्ट्स चा विद्यार्थी आकाश सतीश शिंदे यांनी साकारली आहे.या स्मारकाचे उद्धाटन आपली आई गं.भा.शेवंती नारायण गोळे यांच्या हस्ते केले.गोळे बंधूंच्या आपल्या वडीलांप्रती असलेल्या प्रेमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog