कशेडी येथे भीषण अपघात
एक मृत्युमुखी तर एकजण जखमी
पोलादपुर -प्रतिनिधी
 पोलादपुर तालुक्यातील कशेडी येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना मुंबई कडुन रत्नागिरी च्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पोने उडवून भीषण अपघात होऊन १ मृत्युमुखी तर १ जखमी झाला आहे.
मुंबई कडुन रत्नागिरी च्या दिशेने जाणाऱ्या  एम एच ४८ बीटी १८१७ ह्या गाडीतील प्रवासी सकाळी ३.३० वाजता च्या सुमारास कशेडी येथे चहा पिण्यासाठी थांबले असता, मुंबई कडुन रत्नागिरी कडे निघालेल्या एम एच ८ ऐ पी ९२११ ह्या टेम्पोने भरधाव वेगात येऊन महामार्गाशेजारील टपरीवर चहा पित असलेले विनीत राऊल, अशोक पानगले, जयेश राऊत यांना उडवल्याने विनीत राऊल हे जागीच मृत्युमुखी पडले तर अशोक पानगले हे गंभीर जखमी झाले असुन पोलादपुर ग्रामीण रुग्णालयात प्राथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर जे जे रुग्णालय मुंबई येथे हलविण्यात आले आहे, जयेश राऊत किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर  पोलादपुर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेतील टेम्पो चालकावर पोलादपुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस हवलदार दिलीप सरांगे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog