सेवाव्रती ढेबे दांपत्याचा कौतुकास्पद उपक्रम 

लग्नाचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने केला साजरा


रोहा- प्रतिनिधी 

रोहा तालुक्यातील कारीवणे गावच्या जनार्दन भांबू ढेबे व त्यांची पत्नी सारिका ढेबे यांनी लग्नाचा वाढदिवस वृद्धाश्रमात जाऊन अनोख्या पध्दतीने साजरा केला.

वृध्दाश्रमातील आजी-आजोबांबरोबर गप्पा मारून, त्यांना गरजेच्या वस्तू,फळे,देऊन मोठ्या आनंदाने लग्नाचा वाढदिवस साजरा केला. गेल्यावर्षी म्हणजेच 2021 मध्ये कोविड काळात त्यांनी गोरगरिबांना धान्य वाटप केले.गरजू लोकांना जमेल तेवढी मदत केली. तसेच कोवीडच्या कालावधीत कोवीड सेंटर सुरू केले. 


कोवीडमधील रुग्णांना ने- आण करण्यासाठी ॲम्बुलन्स ची सोय केली. कोवीडमधील रुग्णांसाठी फळे, भाज्या, अन्न पुरविणे, रुग्णांना दररोज पौष्टिक अन्न देणे, रात्री-अपरात्री कोवीड रुग्णांना मदत लागल्यास वेळ- काळ न बघता कोवीड सेंटर मध्ये हजर राहत.कोवीड काळात कोणाला काही अडचण आल्यास एका फोनवर त्यांच्या मदतीला धावून जात व त्यांच्यापरीने ती अडचण दूर करण्याचा ते प्रयत्न करीत असत. 

खरोखर एक दूत म्हणून कोरोना योद्धा म्हणून जनार्दन ढेबे यांनी मोलाचे काम केले. घरातल्या प्रत्येकाचा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने साजारा करणे हा त्यांचा मानस आहे. कोरोना काळानंतर 14 मार्च 2022 रोजी त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस त्यांनी काळकाई वृद्धाश्रमात जाऊन साजरा केला. समाजसेवेचे व्रत त्यांनी हाती घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

****************************
Comments

Popular posts from this blog