"अद्वितीय आदिती" 

पालकमंत्री आदिती तटकरे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा ठरला डोळ्याचे पारणे फेडणारा

 कार्यक्रमास रसिकांचा अभुतपुर्व प्रतिसाद 


रोहा-शरद जाधव

  राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित "अद्वितीय आदिती" या सोहळ्यात हजारो रसिक प्रेक्षकांना अक्षरशः एका दैदिप्यमान कार्यक्रमास उपस्थित राहण्याची पर्वणी लाभली.

  महिला कब्बडी स्पर्धा व होम मिनिस्टर कार्यक्रमास तर तुफान गर्दी पाहावयास मिळाली .



                   जिल्हा परिषद अध्यक्ष ते थेट राज्याच्या मंत्री,अशी कर्तबगारी गाजवलेल्या अदितीताई तटकरे च्या कार्य कर्तृत्वाचा गौरव तसेच भविष्यात त्यांना राजकीय प्रेरणा, बळ मिळावे याकरिता,सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व राकेश शिंदे यांच्या संकल्पनेतून सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने कोलाड विभागातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते.  विशेष म्हणजे या सोहळ्यास खासदार सुनिल तटकरे व सौ. वरदाताई सुनिल तटकरे यांनी लेकीच्या कर्तृत्वाचा होणारा सन्मान पाहण्याकरिता जातीने हजेरी लावली होती.  स्वतःच्या गावात झालेला भव्य दिव्य कार्यक्रम, यामुळे साहेब खुष होते. आपला मुलगा व कन्या अदिती यांनी अल्पावधीतच जिंकलेली तरुणाईची मने ,त्यांना मिळणारे  तरुण वर्गाचे पाठबळ याचा आनंद आई -वडिलांच्या चेहऱ्या वर दिसत होता. 



                       यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान,वृध्दांना साहित्य वाटप गोरगरिबांना मोफत आरोग्य तपासणी, गाव तेथे बसस्थानक या अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून,पहूर,पुई,म्हस्करडी येथे बसस्थानक लोकार्पण सोहळा असे विविध समाजपयोगी कार्यक्रम घेण्यात आले होते. 

                     तर यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या श्रीमती शकुंतला खटावकर,भारत श्री सागर कातुर्डे तसेच अपघात काळात आपत्तीमधे महत्वपुर्ण योगदान देणारे महेश सानप , कोरोना काळात उत्तम वैदकिय सेवा पुरवणारे राजेश मटकर या गुणवंताचा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार अनिकेत तटकरे यानी दिलेल्या शब्दाप्रमाणे भारत श्री सागर कातुर्डे यास 1 लाखाची मदत देण्यात आली. तर यावेळी अदिती ताई च्या पुढील वाढदिवसाला महिलांचे राज्यस्तरिय कबड्डी सामने भरविले जातील असे सुचोवात केले.

 महिलांच्या आकर्षणाचा कार्यक्रम ठरला तो" खेळ पैठणीचा". या कार्यक्रमाला "तुझ्यात जीव  रंगला फेम धनश्री कडगावकर" उपस्थित होती. टि.व्ही वर दिसणाऱ्या तारकेला पाहता आल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला.  



खेळ पैठणीचा कार्यक्रम उशीरा पर्यंत रंगला. यामध्ये  अनेक स्पर्धकांना मागे टाकित याच आंबेवाडी गावच्या भगिनी सौ. सौम्या स्वप्निल लोखंडे हिने  पैठणीचा मान मिळवला.

      तर सेजल शिर्के, मिना वालेकर ,स्विटी चव्हाण यांना पारितोषीक देण्यात आले. 

सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युटूब वर व टि.व्ही चॕनल वर दाखवण्यात आल्याने सदर कार्यक्रम घरा- घरात पोहचला. लावणी कलाकार सोनाली पवार यांच्या लावणी अदाकारिने रसिक वर्ग खुष झाला 



    सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व राकेश शिंदे यांच्या संकल्पनेतील "अद्वितीय अदिती" या उपक्रमास स्थानिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 




     

Comments

Popular posts from this blog