कु.अथर्व चंद्रकांत रोडे एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण
तळा -कृष्णा भोसले
तळा नगरपंचायत उपनगराध्यक्ष
चंद्रकांत रोडे यांचे सुपुत्र कु. अथर्व चंद्रकांत रोडे यांनी
एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केली असुन त्यांचेवर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कु.अथर्व रोडे यांनी भारती विद्यापिठ मेडीकल कॉलेज सांगली येथे ही पदवी मिळवली असुन ते २२वर्षात डॉक्टर झाले आहेत.सुरवातीला त्यांचे प्राथमिक शिक्षण तळे शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक विद्यामंदिर तळा येथे झाले असुन त्यानंतर
अकरा ते बारावी पर्यंतचे शिक्षण गरवारे कॉलेज पुणे येथुन केले आहे.
तदनंतर भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज सांगली येथे साडेचार वर्षे एमबीबीएस (डॉक्टरी) शिक्षण झाले असुन त्यांनी पहिल्या
फेरीत उत्तीर्ण होऊन तळा तालुक्याचे नाव रोशन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
Comments
Post a Comment