आज कोलाडमध्ये रंगणार खेळ पैठणीचा, कोणाला मिळणार पैठणीचा मान? 

सुप्रसिध्द अभिनेत्री धनश्री कडगावकर राहणार उपस्थित



  रोहा-शरद जाधव


                 रायगड च्या पालकमंत्री, कमी कालावधीत राजकारणात ठसा उमटवलेला, असे सर्व लहान थोरामोठ्याचे  लाडके नेतृत्त्व सर्वांच्या अदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे अदितीताई च्या राजकिय कार्याचा गौरव म्हणून "अद्वितीय अदिती" या उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामधे खास महिला वर्गाकरिता खेळ पैठणींचा खेळ रंगणार आहे.  या कार्यक्रमाचे उद्धघाटन सौ. वरदाताई सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते होणार असुन टि.व्ही. मालिकेतील सुप्रसिध्द अभिनेत्री,तुझात जीव रंगला फेम धनश्री कडगावकर उपस्थित  राहणार आहेत. त्यामुळे  मालिकेत पहावयास मिळणारी अभिनेत्री प्रत्यक्ष कोलाडात येत असल्याने महिला वर्गाची कार्यक्रमाची आतुरता शिगेला पोहचली आहे.


                   तर या कार्यक्रमा बरोबरच शालेय साहित्य वाटप जेष्ठ नागरिकांना तसेच निराधार यांना मदतीचा हात, गाव तेथे बसस्थानक या अनिकेत भाईं च्या संकल्पनेतून पुई म्हस्करवाडी अशा अनेक गावात बसस्थानके असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. 


           केवळ आमदार व मंत्री म्हणून नव्हे तर तळागाळातील लोकांची कामे कशी करता येतील याचा ध्यास घेत त्याही पलिकडे जाऊन रायगड चे पालकत्व मोठ्या हिमतीने सांभाळत चक्रीवादळ,कोरोना, महाड दरड दुर्घटना ,यामधे अदिती ताई ने केलेले काम समस्त रायगड वासीयाने पाहिले आहे त्यामुळे कोण हटाव बोलला तरी हे हटणारे नेतृत्व नसुन आदितीतांई चा राजकिय आलेख सुनिल तटकरे पेक्षा ही काहीसा अधिकचा असणार आहे. या राजकिय कार्याचा गौरव होणे उचित असुन याकरिता तटकरे प्रतिष्ठान च्या वतीने भव्य दिव्य अशा कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे राकेश शिंदे  व त्यांची टिम हा कार्यक्रम आधिकचा देखणा कसा होइल याकडे जातीने लक्ष घालीत आहेत.


                  तर सदर पैठणीच्या कार्यक्रमासाठी सर्व महिला वर्गानी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी असे आवाहन तालुका अध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले आहे.


                

Comments

Popular posts from this blog