तेजस्विनी फाउंडेशन तर्फे रिक्षा चालक व पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा संपन्न


कुसुंबळे-प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन रायगड तर्फे आयोजित सन्मान सोहळा कार्यक्रमात पनवेल येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिला तसेच कोपरखैरणे येथील रिक्षा चालक महिलांनी परिस्थितीवर मात करून निवडलेल्या क्षेत्राचा तसेच कार्याचा गौरव करीत त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. 


यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.डॉ.नेहा अनिस राऊत,पनवेल महानगरपालिका नगरसेविका राजश्री वावेकर, अलिबाग उपनगराध्यक्षा तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मानसी संतोष म्हात्रे, पनवेल महानगरपालिका नगरसेवक समीर ठाकूर, अध्यक्ष राज सांस्कृतिक व क्रीडा मंडळ महेंद्र वावेकर,तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतीक फाउंडेशन संस्थापिका व अध्यक्षा जिविता पाटील, उपाध्यक्षा भाग्यश्री तांडेल, संचालक देवेंद्र केळुस्कर, पनवेल विभाग प्रमुख राखी पाटील, खजिनदार विजय पाटील, धीरज पाटील,अलिबाग विभाग प्रमुख श्वेता पाटील, तेजस्विनी फाउंडेशन पनवेल कार्यकारी सदस्या शालिनी भोसले, दिपाली मोकाशी, सुशांत तांडेल,वंदना येरुणकर, दिपक लाडे, बाळाराम पाटील, गंगाराम मायदे, जयश्री खुटले, निर्झरा खुटले, सुनीता अदावले, शैलेश घरत, वंदना निर्मल, वैशाली चंदनशिवे, जैतून शेख इ. मान्यवर मंडळी उपस्थितीत होते. 


सदरील कार्यक्रमांमध्ये कोपरखैरणे येथील रिक्षाचालक महिलांना तेजस्विनी फाउंडेशनचे  पदाधिकारी यांनी  प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ॲड. डॉ. निहा राऊत यांच्या शुभहस्ते रिक्षाचालक महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर पनवेल येथील तक्का पेट्रोल पंपाजवळील १६ महिलांना नगरसेविका मनपा. राजश्री वावेकर, उपनगराध्यक्षा ॲड.मानसी म्हात्रे, नगरसेवक समीर ठाकूर, ॲड.डॉ.निहा राऊत व तेजस्विनीचे पदाधिकारी यांनी महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ॲड. डॉ. निहा राऊत यांनी यावेळी महिलांना आपल्या कामाशी प्रामाणिक रहा व रिक्षा चालविणे किंवा पेट्रोल पंपावर काम करणे ही कमीपणा वाटून घेण्याची कामे नाहीत तर ती मेहनतीची कामे आहेत आणि म्हणूनच तुमच्या कार्याची दखल तेजस्विनी फाऊंडेशन ने घेतली आहे असे मत व्यक्त केले. नगरसेविका राजश्री वावेकर यांनी तेजस्विनी फाऊंडेशन अलिबागने पनवेलच्या महिलांनी दखल घेतली त्याबद्दल अध्यक्षा जिविता पाटील यांचे कौतुक करीत नगरसेविका या नात्याने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी नक्कीच बांधील राहू असे आश्वासन उपस्थित महिला वर्गाला दिले. तर गौरविण्यात आलेल्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त करीत असताना पेट्रोल पंपावर सुरुवातीला आम्हाला कोणीच काम देत नव्हते. ८ ते ९ तास उभे राहून महिला काम करणार नाहीत असे म्हणून नकार देत असत परंतु तिवारी सरांनी आम्हाला संधी दिली व आम्ही ते करून दाखविले. सुरुवातीला २ महिला पेट्रोल पंपावर करीत होतो आज १६ महिला प्रामाणिकपणे काम करीत आहोत. याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे असे मत व्यक्त करून आज तेजस्विनी फाउंडेशन ने रायगड मधून येऊन आम्हाला आमच्या कामाच्या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. पेट्रोल पंपावर काम करणं ही कमी दर्जाची गोष्ट नाही याची जाणीव तुम्ही आम्हाला करून दिली त्यामुळे यापुढे आम्ही अधिकाधिक स्फूर्ती ने काम करू असे मत या वेळेला त्यांनी व्यक्त केले.


Comments

Popular posts from this blog