श्री सदस्यांनी तळा शहरात राबविले स्वच्छता अभियान


तळा :किशोर पितळे

ज्येष्ठ निरुपणकार थोर समाज सुधारक महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारत देशाचे स्वच्छतादूत आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉक्टर श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने तळा शहरात स्वच्छता अभियान १ मार्च रोजी राबविण्यात आले.या स्वच्छता अभियानामध्ये शहरातील प्रमुख रस्ते व तालुक्यातील सरकारी कार्यालय येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यां कडून स्वच्छता करण्यात आली.हे स्वच्छतेचे काम स्वयंस्फूर्तीने सामाजिक बांधिलकी व समाजाचे ऋण या जाणीवेने वेळोवेळी करण्यात येते तसेच डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.

वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन,दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर व मार्गदर्शन पाणपोई,बस स्टँड इत्यादी विविध उपक्रम एक सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय काम म्हणून राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून तळा शहरामध्ये स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छतेचे काम करण्यात आले.आज जवळ पास १४ टन कचरा उचलण्यात आला आणि नियोजित डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकण्यात आला. यासाठी ट्रॅक्टर व इतर वाहनांचा वापर करण्यात आला. तसेच २१४ श्री सदस्यांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला. स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य तसेच मास्क,हातमोजे, इत्यादी साहित्य डॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे देण्यात आले. 


या विशेष वैशिष्ट्यपूर्ण स्वच्छता अभियान उपक्रमासाठी तहसीलदार अण्णापा कनशेट्टी ,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरसेवक नरेश सुर्वे,मंगेश पोळेकर,नगरसेविका पुष्पा नागे ग्रीष्मा बामणे, अर्चना तांबे,यामिनी मेहतर, स्विकृत नगरसेवक भास्कर गोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog