ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात रंगला खेळ पैठणीचा 

जागतिक महिलादिन केला विविध कार्यक्रमांनी साजरा

कर्तृत्ववान महिलांचा केला सन्मान कोलाड -श्याम लोखंडे 

रोहा तालुक्यातील मंजुळा एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे ८ मार्च जागतिक महिला दिवस म्हणून येथील विद्यार्थी पालक माता भगिनी यांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साह वातावरणात विविध कार्यक्रमांनी साजरा करत यावेळी कर्तबगार महिलांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला .

रोहा तालुक्यातील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब यांच्या वतीने व विद्यार्थी पालक माता भगिनी यांच्या सहकार्याने या ठिकाणी जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थी पालक माता भगिनीं यांनी अनोखा उपक्रम व विविध कार्यक्रम करत हा दिवस मोठ्या उत्साह वातावरणात साजरा केला असून सदरच्या कार्यक्रमात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक ,राजकीय,क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा यावेळी मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला .


यावेळी प्रमुख पाहुण्या व सत्कारमूर्ती रोहा प्रेसक्लब सदस्या तथा सामाजिक व शिक्षण प्रेमी सौ समिधा अष्टीवकर ,सेवा निवृत्त शिक्षिका सौ मालती खांडेकर,आंबेवाडी जिल्हा परिषद गट महिला अध्यक्षा सौ सुप्रिया जाधव,रोठ बुद्रुक ग्राम पंचायतीच्या सदस्या व पर्यावरण प्रेमी सौ श्रद्धा घाग,खांब ग्राम पंचायतीच्या सरपंच सौ रंजना टवले, सदस्या मानसी चितळकर ,शेणवई ग्राम पंचायत सरपंच डॉ प्रगती देशमुख ,कोलाड पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार प्रज्ञा चेरकर व मेघा तावडे,सामाजिक कार्यकर्त्या सौ गुलाब महाडिक सौ पूजा लोखंडे,आदिवासी महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ गुलाब वाघमारे ,आशा समाजातील कर्तबगार महिला प्रमुख पाहुण्या व विशेष सत्कारमूर्ती म्हणून या कार्यक्रमासाठी लाभल्या होत्या .

या प्रसंगी जागतिक महिला दिन म्हणून सदरच्या उपस्थित महिलांना यावेळी ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब च्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रिया लोखंडे व उपस्थित शिक्षकांच्या वतीने या कर्तबगार महिलांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .तसेच या प्रसंगी या दिनाचे औचित्य साधून येथील पालक महिला वर्गानी विशेष खेळ पैठणीचा असे विविध खेळ खेळत सत्कारमूर्ती व उपस्थित महिलांची मने जिंकली तर खेळ पैठणीचा झाला त्यात सुप्रिया वारेकर ह्या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर उपविजेत्या मानसी कचरे व स्नेहा अमनकर ह्या भगिनी विजयी ठरल्या तर यांना उपस्थित सत्कारमूर्ती तसेच कर्तबगार महिलांच्या शुभेहस्ते पैठणी व भेटवस्तू देत त्यांना सन्मानित करण्यात आले .

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु आर्या लोखंडे हिने केले प्रास्थाविक शिक्षिका सोनाली शिंदे यांनी केले तर उपस्तीत महिलांना सौ समिधा अष्टीवकर, सुप्रिया जाधव,मालती खांडेकर ,श्रद्धा घाग,डॉ प्रगती देशमुख,रंजना टवले,गुलाब वाघमारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका रिया लोखंडे यांनी केले .सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका ऋतुजा पवार,प्रतीक्षा धामणसे ,कर्मचारी संतोषी वाळंज ,यांनी अथक परिश्रम घेतले तर सांगता गोड फरारानी करण्यात आली .

Comments

Post a Comment

Popular posts from this blog