श्रीमती पार्वतीबाई ( सुंदराबाई ) बाळाराम कदम यांचे निधन 

कोलाड -श्याम लोखंडे 

रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशीतील गावठण येथील श्रीमती पार्वतीबाई (सुंदराबाई ) बाळाराम कदम यांचे वयाच्या 92 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळृला असून परिसरात शोककळा पसरली आहे .

 पार्वतीबाई परिसरात सुपरिचित होत्या. आपल्या पतीसमवेत पराकष्टा करत संसाराचा गाडा चालवत. पारंपरिक पद्धतीचा शेती व्यवसाय व त्याला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन म्हणजे गाई म्हशींचा सांभाळ करत दुग्धव्यवसायच्या जोरावर कुटूंबाचे सांभाळ केले. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्राची मोठी आवड. तसेच वारकरी संप्रदायाचा कुटूंबात वारसा जोपासत सामाजिक कार्यात अग्रेसर राहत महिलांच्या सर्व विविध कार्यक्रमात नेहमी सक्रिय सहभाग घेणाऱ्या मोठ्या कदम परिवारातील सुंदराबाई यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

कै.पार्वतीबाई कदम यांच्या पश्चात पाच मुले आणि दोन मुली,पुतणे,सुना, जावई, नातवंडे,पतवंडे, तसेच नात जावई,असा मोठा  परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दिनांक 23 मार्च व उत्तरकार्य तेरावे शनिवार दिनांक 26 मार्च 2022 रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे गावठण येथे होणार आहेत. धार्मिक आणि आध्यात्मिक पद्धतीने संपन्न होत असलेल्या कार्यक्रम प्रसंगी धामणसई पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध कीर्तनकार दिनेशभाई कडव (गुरुजी) यांचे किर्तनरुपी सेवेतून त्यांना  भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog