लायन्स क्लब ऑफ कोलाड-रोहा आयोजित मोफत नेत्र तपासणीला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

 शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी, वीस रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया 



कोलाड - श्याम लोखंडे 

लायन्स क्लब ऑफ कोलाड, लायन्स क्लब रोहा,लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग , समता फाऊंडेशन मुबंई,अंशुल स्पेशालीटी मॉलेक्युल्स लिमिटेड धाटाव रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने व लायन्सक्लबचे मार्गदर्शक तथा चेअरपर्सन लायन रविंद्र घरत यांच्या विशेष मार्गदर्शनातून शिवमुद्रा मित्र मंडळ व ग्रामस्थ महिला मंडळ गावठण यांच्या सहकार्याने 9 मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिराचे आयोजन जय भवानी माता सामाजिक मंदीर सभागृह गावठण येथे करण्यात आले होते.



सदरच्या आयोजित शिबिराला येथील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात शंभरहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.तर 20 गरजू रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली .यावेळी लायन्स क्लबचे चेअरपर्सन लायन रविंद्र घरत,लायन्सक्लब ऑफ रोहा चे अध्यक्ष नुरुद्दीन रोहवाला,अंशुल स्पेशाल्टी मॉलेक्युल्स लिमिटेडचे साईट हेड शिरीष सातपुते,शिताळकर ,कोलाड लायन्सक्लब चे सचिव रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्याम लोखंडे, बोर्ड ऑफ डायरेक्टर डॉ विनोद गांधी,लायन महेश तुपकर ,राजेंदर कोप्पू,लायन हेल्थ फाऊंडेशन अलिबागचे प्रमोद केळकर, शुभम जाधव, सुजित पाटील ,गांधी पॅथॉलॉजी कोलाड आंबेवाडी च्या टेक्निशियन मोनिका लोखंडे,देविका आंब्रूस्कर ,आदी ग्रामस्थ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .



लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांच्या वतीने मोफत आयोजित केलेल्या नेत्र तपासणीसाठी लायन्स क्लबचे चेअरपर्सन लायन रविंद्र घरत यांच्या व अंशुल कंपनी यांच्या सौजन्याने गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. तर कोलाड-रोहा लायन्स क्लब चे अध्यक्ष डॉ .सागर सानप यांचे मार्गदर्शन लाभले तर हे शिबीर यशस्वी करण्यासाठी लायन महेश तुपकर,नितेश शिंदे,व शिवमुद्रा मंडळाचे स्वप्नील कांदळेकर ,दत्ता सानप सह मंडळातील पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले .

Comments

Popular posts from this blog