जनकल्याण समिती रोहा तर्फे महिला दिन उत्साहात साजरा



रोहा- निखिल दाते

मंगळवार  दिनांक 8 मार्च 2022 रोजी मातोश्री मंगल कार्यालय रोहा येथे संध्याकाळी ५.४५  ते ७.१५ या वेळेत रा. स्व .संघ जनकल्याण समितीतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून  सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त निवडणूक नायब तहसीलदार आणि महिला पोलीस यांच्याशी परिसंवाद असा कार्यक्रम करून पहिले पुष्प उत्साहात अर्पित करण्यात आले  . 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी निखील दाते यांनी केले ,त्यानंतर प्रास्ताविक सौ. आरती गिरीश पेंडसे यांनी केले तर  समारोप आभार सौ .अरुंधती बळवंत पेंडसे यांनी केले. राष्ट्रसेविका समितीच्या तरुण सेविका कु. शिवानी भांड आणि कु. अनघा पेंडसे या दोघींनी दंड प्रहार याचे प्रात्यक्षिक दाखविले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रोहे तहसिलदार कार्यालयाच्या निवडणूक नायब तहसिलदार सौ. मानसी साठे आणि महिला पोलीस नाईक प्रशिला साळुंखे ,पोलिस कॉन्स्टेबल शीतल महाडिक यांच्याशी  संवाद साधत कार्यक्रमाची रंगत वाढली. सौ भाग्यश्री रत्नपारखी यांनी  वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता केली .साधारण कार्यक्रमाला 50 ते 55 जणांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी कऱण्यासाठी जनकल्याण समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली .

कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपस्थित महिला व श्रोतुवर्गानी आयोजकांचे विशेष कौतुक केले .

Comments

Popular posts from this blog