"टिका करणे हे विरोधकांचे काम असले तरी, लोकांची सेवा करणे हा माझा धर्म आहे" - खासदार सुनिल तटकरे 


म्हसळा -श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा श्रीवर्धन तालुक्यातील जनतेने सन 2019 पासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शक्ती उभी केली म्हणूनच तुमचा हक्काचा आमदार, मंत्री आणि खासदार होण्याची संधी मिळाली. लोकांच्या हिताची प्रभावीपणे काम करण्याची बांधिलकी घेत पुढील कालावधीत आपल्याला काम करायचे आहे ,असे मनोगत आणि होळी उत्सवाच्या शुभेच्छा देताना खासदार सुनिल तटकरे यांनी मेंदडीकोंड येथे 10 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सभामंडप व रंगमंच बांधकामाचे उद्धघाटन करताना व्यक्त केले. सार्वजनिक काम करत असताना आपल्यावर टिकाटिप्पणी होत असते, टिका करणे हे विरोधकांचे काम असले तरी ,लोकांची सेवा करणे हा माझा धर्म असल्याचे खासदार तटकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. पुढे बोलताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एखाद्या पक्षाकडून काम होत असेल तर गावातील ग्रामस्थांनी सामुदायिक एकता दाखवली पाहिजे. तशी ती मेंदडी गावात दिसत नसल्याने खासदार तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. होळी आणि धुळवडच्या शुभ मुहूर्तावर मेंदडीकोंड येथे बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभामंडप व व्यासपीठाचे उद्धघाटन खासदार सुनिल तटकरे यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

 या वेळी खासदार सुनिल तटकरे यांचे समवेत तालुका अध्यक्ष समीर बनकर,सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,माजी सभापती महादेव पाटील,अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष नाझीम हसवारे,जमीर नजीर,महिला प्रमुख मीना टिंगरे,रियाजभाई फकिह,जहूर काझी,लहुजी म्हात्रे,अनिल टिंगरे,अनिल बसवत,अक्रम साठविलकर,गाव अध्यक्ष लक्ष्मण धुमाळ,मधुकर धुमाळ,चंद्रकांत धुमाळ,विजय कांबळे,शेवाळे गुरुजी,विजय पायकोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

या परिसरातील नागरिक साहित्यिक, क्रीडा आणि सांस्कृतिक वारसा जोपासना करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात असुन सर्वच उत्सवात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून आपापली कला सादरीकरण करतात म्हणूनच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडुन आपल्या कामाची पूर्तता होईल असा विश्वास वाटतो. म्हणूनच तटकरे यांना एकदा काम सांगितले की ते होतेच असे आवर्जून सांगताना आता गावागावात कामांची अपेक्षा वाढत गेली आहे. मेंदडीकोंड ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन एका मंचावर बसुन सर्व हेवेदावे दुर करत गावातील प्रत्येकी दोन कामे सुचवा येत्या 10 दिवसात त्या कामांना मंजुरी देण्यात येईल असे आश्वासित केले. मेंदडी बरोबरच खरसई,वारळ,बनोटी परिसरात गावांमध्ये सूचित करण्यात येणाऱ्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.18 गाव आगरी समाजाचे विकासासाठी माजी सभापती महादेव पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहात येण्याचा निश्चयाने पक्ष प्रवेश केला आहे आता त्यांचे परतीचे दोर आम्ही कापले आहेत. पूर्वी येथील सत्ताधारी गावागावात एक, दोन लाख रुपयांची विकास कामांची निधीची तरतूद करीत असत त्यातच पाच वर्षे समाधान असे, कधी काळी येणाऱ्यांचा जास्त उदोउदो होत असतो. आम्ही 5 ते 25 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करूनही अधिक निधीची अपेक्षा असते याचा अर्थ काम करणाऱ्याच्याच पाठीवर काठी मारली जाते असा खासदार तटकरे यांनी मार्मिकपणे टोला मारला. सामुदायिकरित्या एकत्रित राहुन काम केल्यास केलेली कामे लोकांच्या पचनी पडतात असा सल्ला खासदार सुनिल तटकरे यांनी मेंदडी ग्रामस्थांना दिला. कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन व स्वागत आदर्श शिक्षक शेवाळे यांनी केले. कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते रायगड भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या भजनी बुवा संतोष शितकर, नाक्ती, दुर्वास पायकोळी, कबड्डीपट्टू नाक्ती, आदर्श शिक्षक शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog