वरसगांव सापया नगरीत अखंड हरीनाम सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न
रोहा-शरद जाधव
गेली अनेकवर्ष सुरु असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहास 2 वर्ष कोरोनामुळे खंड पडला होता.या वर्षी मात्र वरसगांव सापया नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोलाड पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला. ग्रामस्थांच्या व आदिनाथ सेवा मंडळाच्या नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या कार्यक्रमात ग्रामस्थांच्या अध्यात्मिक- सामाजिक एकजुटीचे दर्शन झाले. संपुर्ण गाव या सोहळ्यासाठी तन, मन, धनाने काम करित होता.
महाशिवरात्री निमीत्त दिनांक 1 मार्च रोजी सुरु झालेल्या सप्ताहाने वरसगांव नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदमली होती.सुप्रसिध्द कीर्तनकारांच्या अमृतवाणीचा लाभ उपस्थित जनसमूदायाने घेतला.
यु ट्यूब च्या माध्यमातून लाईव्ह कीर्तनाचा लाभ समस्त महाराष्ट्राने घेतला. त्यामुळे या सप्ताहाची ख्याती सर्वदुर पसरली.
भाविकांनी दिनांक 1 मार्च पासुन ब्रम्हमुर्ती जग्ग्ंनाथ महाराज , ह.भ.प.अनिल महाराज सानप, ह.भ .प. मारुती महाराज कोल्हटकर यांच्या. अमृतमय कीर्तनाचा लाभ घेतला, असुन शुक्रवार दिनांक 4 मार्च रोजी रात्रो 9 ते 11 ह. भ .प. मालवंणकर महाराज (पुणे), शनिवार दिनाक 5 मार्च रोजी ह. भ. प .कैलास महाराज निचीते शहापूर यांचे कीर्तन, तर 6 मार्च रोजी विनोदी तरुण कीर्तनकार ह .भ .प . पठाडे महाराज (अहमदनगर),7 मार्च रोजी ह. भ. प. गणेश महाराज भाग्यवंत (ठाणे) 8 मार्च रोजी काल्याचे कीर्तन ह. भ .प. जगन्नाथ नाथ महाराज यांचे झाले,प्रवचन, हरिपाठ, पारायण,जागर, पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पडले.
सदर सप्ताहास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी भेट दिली.
यावेळी गेली सप्ताह काळात अन्नदाते म्हणून सहकार्य केले ते प्रमोद म्हस्कर ,अभिमान वायकर, वाडेकर साहेब, लहु पानसरे, नुतन स्टील ,सुरज सानप,रेल्वे कामगार (वरसगाव) राकेश शिंदे ,सतिश माणकर, राहुल शिंदे ,प्रशांत शिंदे, आमोद कजबजे, निलेश गांधी, विशाखा राजिवले , यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
कीर्तन सेवेस सहकार्य लाभलेल्या सागरमल जैन,सहदेव कापसे,दत्ताराम पोटफोडे, सापया क्रिडा मंडळ , रमेश सांनप, सुशील शिंदे,,अजित अंबृसकर,महेश ठाकुर, या सर्वांचे ग्रामस्थानी आभार व्यक्त केले. तर गावातील सर्व महिला बचत गटांनी सप्ताह काळात अथक मेहनत घेतली.
कार्यक्रम पार पाडण्याकरिता अदिनाथ सेवामंडळाचे अध्यक्ष अजित अनंत अंबृस्कर,उपाध्यक्ष प्रभाकर सानप,रामचंद्र अंबृसकर, खजिनदार मंगेश सांनप,गणेश सानप,सेक्रेटरी अनंता अंबृसकर,तुकाराम सानप,अशोक लहाने,हिशोब तपासनिस संजय राजीवळे,रमेश सानप,राजेंद्र अंबृसकर ,व ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ बचत गट व तरुण मंडळ यांनी अतिशय मेहनत घेतली.
Comments
Post a Comment