आमदार अनिकेत तटकरे यांची वचनपुर्ती

मुठवली खुर्द येथील सामाजिक सभागृहास 10 लाखांचा निधी 

रोहा-शरद जाधव

                     रोहा तालूक्यातील मुठवली खुर्द येथील सामाजिक सभागृहास आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या आमदार निधीतून सुमारे 10 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसे पत्र  ग्रामस्थांकडे सुपूर्द करण्यात आले.नुकतेच एका कार्यक्रमानिमीत्त आमदार अनिकेत तटकरे मुठवली गावात आले असता,ग्रामस्थांनी त्यांच्याकडे मागणी केली होती.यावेळी क्षणाचाही विलंब न करता दिलेला शब्द पाळत अनिकेत भाई यांनी श्री भैरवीनाथ मंदिरा करिता निधी उपलब्ध करुन दिल्याने, तटकरे काय करु शकतात?हे ग्रामस्थांना पहायला मिळाले. अनेक वर्षांचे मंदिर जीर्ण होणार! या भावनेने गावामधे आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे,

     अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर  मालसई ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला.तद्नंतरच विकास कामांना खऱ्या आर्थाने सुरूवात  झाली.परिसरातील तरुण वर्ग अदितीताई व अनिकेत भाई यांच्या कार्य कर्तृत्वावर खुष होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामं करु लागली.आमदारांची सहज भेट मिळत असल्यामुळे सामाजिक हिताच्या बाबींची मागणी थेटपणे करता येऊ लागली.

  पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतींमध्ये तरुण व नव्या दमाचे सरपंच व सदस्य आहेत. गावच्या समस्या आमदारांच्या माध्यमातून सोडवण्याकरिता जातीने प्रयत्न करित आहेत.

            आज मालसई ग्राम पंचायती सह रोहा तालुक्यात विविध विकासकामांची घोडदौड सुरु आहे. मुठवली खुर्द गावाचा विकास अनेक वर्षे रखडलेला होता.आता गावात विविध विकासकामे सुरू आहेत. स्मशानभूमीचे काम दर्जेदार झाले आहे.

      गावचे ग्रामदेवता भैरवीनाथाचे मंदिर खुप जीर्ण झाले आहे. सदर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय अनिकेतभाईंकडे उपस्थित करताच अध्यात्माविषयी विशेष आवड असल्याने क्षणाचाही विलंब न करता अगोदर ठरलेला रुपये 7 लाख रुपये निधी ,कामाचे स्वरुप पाहून रुपये 10 लाख करुन दिला. त्यामुळे मुठवली खुर्द गावासह याभागात आमदार जातीने लक्ष घालीत असल्याने आगामी पेण विधानसभा मतदार संघात अनिकेत भाईं तटकरे यांच्या सारखा आमदार मिळो अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रोहे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेली हि गावे विकासापासून वंचित होती. दळणवळणाच्या सुविधा, मुबलक पाणी, विजेची सोय,विविध शासकीय योजनांचा जनतेला लाभ मिळावा ह्यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड सुरू  आहे.

      सामजिक सभागृह निधीचे पत्र देताना ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सतिश ठाकुर, युवा कार्यकर्ते महेश तुपकर,मारुती तुपकर,उपसरपंच योगेश शिंदे,सदस्य कविता शेळके, मयुरी तुपकर,राम सावंत,विशाल शिंदे,संदेश तुपकर,राजेंद्र खरिवले,यनजी शिंदे,मंगेश तुपकर,राजेंद्र शिर्के,चंद्रकांत शिंदे,विठोबा तुपकर,अनंता शेळके,राम ठमके,रमेश ,माने, नरेश तुपकर,सुरेश शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याच दिवशी मुठवली गावचे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते,दानशुर व्यक्तीमत्व श्री.महेश तुपकर यांचा वाढदिवस असल्याने आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog