जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग व तहसिलदार कार्यालय रोहा यांचे संयुक्त विद्यमानाने अमृत महोत्सव निमित्ताने कातकरी उत्थान अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांचा सर्वांगिण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून सप्तसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणीस सुरुवात

सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत माननीय डॉ.महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी रायगड यांचे मार्गदर्शनाखाली रोहा तहसील  कार्यालयामार्फत आदिवासी बांधवांना रोजगाराभिमुख मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ याच्या अनुषंगाने दिनांक 8/2/2022 रोजी तहसील कार्यालय रोहा येथे श्रीमती कविता जाधव तहसीलदार रोहा यांचे अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेस रोहा तालुक्यातील एकूण 87 आदिवासी पाड्यातुन 187 आदिवासी बांधव प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. 

सदर कार्यशाळेस श्रीमती कविता जाधव तहसीलदार रोहा, श्री. शामकांत चकोर- जिल्हा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र रायगड अलिबाग श्री.एस. एन. महाजन- उद्योग निरीक्षक, श्री प्रदीप सावंत- जिल्हा प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थी यांना शिधापत्रिका व तीन लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेअंतर्गत रक्कम रुपये  20000 चे  धनादेश वितरण करण्यात आले.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👇👇
Comments

Popular posts from this blog