धाकसुद चिल्हे आयोजित कबड्डी स्पर्धेत जय बजरंग आंबेवाडी संघ अंतिम विजेता 

कोलाड -श्याम लोखंडे

 धाकसुद मंडळ चिल्हे ता.रोहा आयोजित कोलाड विभागीय कबड्डी स्पर्धेत जय बजरंग आंबेवाडी संघ अंतिम विजेता ठरला आहे.

रोहा तालुक्यातील धाकसुद चिल्हे युवक मंडळांने आयोजित केलेल्या व कोलाड विभागीय कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तसेच ग्रामस्थ मंडळ चिल्हे यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत अंतिम फेरीची अटीतटीची लढत जय बजरंग आंबेवाडी व गावदेवी बाहे यांच्यात झाली, रसिक प्रेक्षकांना हा सामना अतिशय रंगदार पहावयास मिळाला.अंतिम लढत मोठी मजेदार व रसिकांना भारावून सोडणारी ठरली. या लढतीत जय बजरंग आंबेवाडी संघ विजेता ठरला तर द्वितीय क्रमांकावर गावदेवी बाहे संघाला समाधान मानावे लागले .

उत्साही वातावरणात कबड्डी प्रेमींना आनंद देणाऱ्या या कबड्डी स्पर्धेचे उद्धघाटन कोलाड- खांब- देवकान्हे विभागातील युवकांचे स्फुर्तीस्थान न.शि.प्र.मं. खांब चे अध्यक्ष तसेच गोवे ग्राम पंचायतीचे सरपंच महेंद्र पोटफोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आंबेवाडी जि. प.गणाचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जाधव ,खांब विभाग शेकाप जेष्ठ नेते मारुती खांडेकर सर ,हभप नारायण महाराज महाडिक, रोहा तालुका भाजप उपाध्यक्ष विनायक महाडिक,ठमाजी महाडिक,सहदेव महाडिक,अनिल महाडिक,रायगड भूषण डॉ श्यामभाऊ लोखंडे,मंगेश लोखंडे,गाव कमिटी अध्यक्ष सुधीर लोखंडे,रविंद्र लोखंडे,पोलीस पाटील गणेश महाडिक,आदर्श शिक्षक नंदकुमार मरवडे सर,असोसिएशनचे अध्यक्ष महेश ठाकूर,तुकाराम महाडिक आदी मान्यवर तसेच धाकसुद मंडळाचे सर्व पदाधिकारी, कोलाड विभागातील कबड्डीपटू व क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पर्धेत अंतिम विजेता आंबेवाडी संघ तर उपविजेता बाहे संघ तसेच तृतीय क्रमांकचे मानकरी सापया वरसगाव व चतुर्थ क्रमांक धाकसूद चिल्हे संघांनी पटकावले आहे .तर स्पर्धेतील मालिकावीर आंबेवाडी संघाचा अखिलेश गाडगे, उत्कृष्ट चढाईपटू बाहे संघाचा विजय माठल ,तर उत्कृष्ट पक्कड़ पुरस्कार वरसगांव संघाचा नितेश सानप हे मानकरी ठरले. विजयी संघाना तसेच खेळाडूंना पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.

आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मंडळाच्यावतीने करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धाकसुद मंडळ चिल्हे च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog