कर्नाळा गावचे सुपुत्र डॉ.राजेश गोपाळ शिगवण सर हे Sociology SET परीक्षेत उत्तीर्ण


तळा -किशोर पितळे

तळा तालुक्यातील कर्नाळा गावाचे आदर्श व्यक्तिमत्व  कुणबी समाजभुषण डॉ.राजेश शिगवण सर यांनी Sociology विषयात SET परीक्षेत यश संपादन करून कर्नाळा गावासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाआहे..जिद्द,आत्मविश्वास, सबुरी च्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केले आहे.आर्थिक परिस्थिती बेताची असुन नोकरी करून शिक्षण घेत होते त्या बरोबर कुणबी युवा संघटना,ग्रामीण,शहरी,मुंबई विभाग तसेच ओ बी सि जात संघर्ष समीतीचे मुख्य प्रवर्तक,कुणबी समाजोन्ती परिषद सदस्य,व्यसनमुक्ती रुढी परंपरा तिलांजलीसाठी जनजागृती अशी सामाजिक कार्य सांभाळून Sociology SET परीक्षेत यश मिळवले आहे.डॉ. राजेश शिगवण सर यांनी आतापर्यंत... पुढील शिक्षण प्राप्त केले.

- Ph.D. (Education)

- M.Ed (Education)

- M. A. (History)

- M. A. (Political Science)

- M. A. (Sociology)

- M. A. (Public Administration)

- NET (Education)

- SET (Education)

- SET (Political Science)

- SET (Sociology)

- Masters of Career Guidance

- Deploma in Psychology 

शिक्षण क्षेत्रातील पदव्या संपादन केल्या आहेत. अशा अलौकिक यशांबद्दल कर्नाळा गावातर्फे डॉ. राजेश शिगवण सर यांच्या वर अभिनंदन वर्षाव होत आहे. तसेच तळा तालुक्यातील सर्व क्षेत्रातून कौतुक केले जात असून रायगड जिल्हा कुणबी युवा अध्यक्ष सचिन कदम पंचायत समिती सभापती अक्षरा कदम यांनी खास अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog