रोह्यात माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा

धाटाव-प्रतिनिधी 

 हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे .माघ चतुर्थीला श्री गणेशाचा जन्मदिन,गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी  

गणेशाचे असंख्य भक्त ह्या माघी  गणेश जयंतीला बाप्पाची मनोभावे पुजा करतात.  यानिमित्ताने धाटाव औद्योगिक वसाहतील अंशुल केमिकल्स या कारखान्यात शुक्रवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी "अंसुलचा राजा"म्हणून प्रशिध्द गणेश जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने सलग पंचवीसावे वर्षे साजरे करण्यात आले.दुपारी पूजा , आरती व दुपारनंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट लक्ष्मण शिट्याळकर , रोठ बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच नितीन वारंगे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा रोठ बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अमित घाग ,  उपसरपंच वेदिका डाके, सदस्या वैभवी भगत , रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष राजेश डाके,  कामगार आघाडीचे अध्यक्ष विलास डाके,  राजमुद्रा फाउंडेशन चे कार्याध्यक्ष राजेश भगत, सुप्रिया वारंगे , शशिकांत साळूंखे , ग्रामसेविका अलका बामगुडे , कंपनीचे एच. आर, मॅनेजर किशोर तावडे यांसह  कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog