शिववंदना वाचनालय वाशी आयोजित विशेष मुलाखत व वकृत्व स्पर्धा संपन्न
रोहा-प्रतिनिधी
शिववंदना वाचनालय वाशी ता.रोहा हे नेहमीच विविध उपक्रम राबवीत असतात. त्यातीलच एक, नवीन वर्षाचा पहिलाच कार्यक्रम म्हणजे वकृत्व स्पर्धा व पत्रकार कुमारी रविना मालुसरे यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली होती. वाचनालयातील या उपक्रमात सहभागी स्पर्धकांनी अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देऊन आपली मते व्यक्त केली. यावेळी वाचनालयातील शिवकन्यांनी खुप सार्या गप्पा मारत अनौपचारिक वातावरणात पत्रकार रविना मालुसरे यांचा जीवन प्रवास जाणून घेतला. मुलींनी आपलं जीवन "स्व" विचारांवर कसं जगावं हे जाणून घेतलं.शिववंदना वाचनालयाचे संस्थापक श्री. प्रशांत शिवराम बर्डे हे गेल्या पाच वर्षांपासून अनेक उपक्रम राबवित आहेत. योग्य वयात, योग्य मार्ग दाखवण्याचे काम ते करत आहेत. कार्यक्रम उत्साहाने पार पडला.
वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रणाली प्रशांत भोईर, द्वितीय क्रमांक आर्यन प्रशांत बर्डे, तृतीय क्रमांक विक्रांत विश्वास जोगडे, उत्तेजनार्थ विराज विठोबा बाकडे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार आर्यन बर्डे यांनी केले."एकच ध्यास,शिव विचारांचा प्रसार", हे ब्रीदवाक्य घेऊन शिववंदना वाचनालय हे काम करीत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती व स्पर्धेचे परीक्षक श्री. हितेश देवरे सर,पत्रकार कु.रविना मालुसरे, आर्मी मॕन श्री.सौरभजी खांडेकर, श्री. विरेंद्रस्वामी जंगम त्याचप्रमाणे शिवकन्या व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment