जैन समाज संकेत ग्रुप मुंबई यांचा आदिवासी कुटुंब, विद्यार्थ्यांना मदतीचा हात.
सामाजिक बांधिलकीतून जैन समाज संकेत ग्रुप गोरेगाव मुंबई या संस्थेच्या वतीने तळा तालुक्यातील दुर्गम पाड्यातील चरई आदिवासी वाडी येथील १०० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले त्याचबरोबर निराधार विधवा महिलांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी १हजार रुपये व ब्लँकेटचे वाटप केले.या संस्थेच्या वतीने येथील राजिप चरईआदिवासी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खेळणी, रंगीत कपडे यांचे देखील वाटप करण्यात आले.
कोरोनाची झळ सर्वच स्तरातील नागरिकांना बसत आहे. तळा तालुक्यातील ग्रामीण भागालाही त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. रोजंदारीवर काम करून पोट भरणाऱ्यांना आर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागतो आहे.याचे भान ठेवत तत्परता दाखवून जैन समाज संकेत ग्रुप गोरेगाव मुंबई व समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या माध्यमातून चरई आदिवासी वाडी येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जैन समाज संकेत ग्रुप गोरेगाव मुंबईचे अतुलभाई शाह, भरतभाई अदानी, समाजसेवक कृष्णा महाडिक, शाळेच्या मुख्याध्यापीका कल्याणी वाजे गायकर,दुधाळ सर,लाड सर,ढोलेसर,व्यवस्थापक समिती अध्यक्ष संजय हीलम, गावचे अध्यक्ष गणपत कोळी,उपाध्यक्ष श्रावणजाधव,चंद्रकांत हिलम ग्रामस्थ, महिला मंडळ, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जैन समाज संकेत ग्रुप गोरेगाव मुंबईचे अतुल भाई शाह,भरतभाई अदानी, समाजसेवक कृष्णा महाडिक यांनी उपस्थित राहून आपला सहभाग दर्शवला आहे. तसेच कोरोना रोगाबद्दल जनजागृती करून घ्यावयाच्या काळजी याबाबत जनजागृतीही त्यांनी केली व आदिवासी बांधवांना आर्थिक मदत, धान्य वाटप शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले त्यांच्या या सामाजिक बांधीलकीचे कौतुक करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment