तळा नगरपंचायतीवर फडकला राष्ट्रवादीचा झेंडा

तळा नगरपंचायत नगराध्यक्षपदी अस्मिता भोरावकर तर उप नगराध्यक्षपदी चंद्रकांत रोडे विराजमान 


तळा-किशोर पितळे

संपूर्ण रायगड जिल्ह्याचे नगरपंचायत निवडणूकीचे लक्ष तळ्याकडे लागले होते.तळ्यात गेली २०वर्षे सेनेकडे सत्ता होती.आज राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्षापदी अस्मिता चंद्रकांत भोरावकर तर उप नगराध्यक्षपदी चंद्रकांत रोडे विराजमान झाले आहेत. २१ डिसेंबर २१व १८ जाने२०२२ पार पडलेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या१०,शिवसेना४भाजप,३ असे उमेदवार निवडून आले.त्यामुळे राष्ट्रवादीला जनतेने स्विकारले असल्याचे समोर आले आहे. ६फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदासाठी अस्मिता भोरावकर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आज नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली . निवडणूक पिठासन अधिकारी विठ्ठल इनामदार व मुख्याधिकारी माधुरी मडके यांनी सौ.अस्मिता चंद्रकांत भोरावकर यांची नगराध्यक्षापदी व चंद्रकांत रोडे यांची उपनगराध्यक्षपदी अधिकृत घोषणा केली.उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव चंद्रकांत रोडे याचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली.सभागृहात १७च्या १७ नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.आ.अनिकेत तटकरे यांनी नगराध्यक्षा सौ.भोरावकर उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व या निवडणुकीत शिवसेना, भाजपा यांनी सहकार्य करून निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानले. खा.सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली तळा तालुक्याचा सर्वांगीण विकास केला जाईल. असे अभिवचन देऊन सर्वांचे आभार मानले. आता राजकारण संपले असून आता विकासाचे समाजकारण करण्याचे आवाहन त्यांनी सर्व नगरसेवकांना यावेळी केले.


नगरपंचायत नगराध्यक्षपदी सौ.अस्मिता भोरावकर व उपनगराध्यक्षपदी चंद्रकांत रोडे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.फटाक्यांची आतषबाजी आणि छोटेखानी मिरवणूक नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांची तळा बाजारपेठेतून काढण्यात आली.   

Comments

Popular posts from this blog