जयभवानी चिंचवली संघ ठरला नाईट क्रिकेट स्पर्धेचा अंतिम विजेता

   कै.प्रदीप सावंत मित्र मंडळ कोलाड-आंबेवाडी आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धा उत्साहाने संपन्न


कोलाड -श्याम लोखंडे

रोहा तालुक्यातील कोलाड-आंबेवाडी येथील कै. प्रदीप सावंत मित्र मंडळाने आयोजित  केलेल्या नाईट क्रिकेट स्पर्धेत जय भवानी चिंचवली संघाने अटीटतीच्या लढतीत स्वराज ग्रुप आंबेवाडी संघावर विजय संपादन करुन पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा फिरत्या  चषकावर आपले नाव कोरून प्रथम क्रमांक पटकवला.

         उत्स्फुर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक स्वराज्य ग्रुप आंबेवाडी नाका, तृतीय क्रमांक जय भवानी रोहा रोड,चतुर्थ क्रमांक जय बजरंग  हेटवणे या संघानी पटकाला.

मॅन ऑफ द सिरीज सूर्यकांत येरुणकर,उत्कृष्ठ फलंदाज राणे,उत्कृष्ठ गोलंदाज श्रीनंद भिलारे, यांना गौरविण्यात आले.

यावेळी युवानेते राकेश शिंदे,गणेश वाचकवडे,अलिम नुराजी,राहुल शिंदे,महेंद्र वाचकवडे सुधीर येरुणकर, सुभाष भोसले,आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog