उपजिल्हा रुग्णालय रोहा-रायगडला राज्यस्तरिय कायाकल्प पुरस्कार

 | रोहा अष्टमी- नरेश कुशवाहा

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे देण्यात येणारा "कायाकल्प पुरस्कार " योजनेत उपजिल्हा रुग्णालय रोहा या रुग्णालयाची Commendation पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कायाकल्प योजने अंतर्गत राज्यातील सरकारी रुग्णालयांचा सहभाग असतो. रुग्णालयातील स्वच्छता , देखभाल ,संसर्ग नियंत्रण,वैद्यकीय कचरा व्यवस्थापन ,देखभाल ,रुग्णांची वर्तणूक इतर सर्व विषेश बाबींची तज्ज्ञांमार्फत परिक्षण व पाहणी करून आठ गुण दिले जातात.


मागील दोन वर्षांमधील कोरोना महामारीमुळे सर्वत्र आरोग्य यंत्रणेवरती मोठा ताण आलेला आहे. उपलब्ध साधन सामुग्री औषधे व मनुष्यबळाच्या सहाय्याने रुग्णांना उच्च प्रतिची सेवा देण्यात शासकीय रुग्णालय कार्यरत आहे. सन 2020-21 मध्ये कायाकल्प पुरस्कार स्पर्धे करीता राज्यातील अनेक रुग्णालये सहभागी झाले होते.त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय रोह्याने 79.08 टक्के गुण मिळवून commendation चे बक्षिस पटकावले होते .

'रुपये एक लाख 'असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

उपजिल्हा रुग्णालय रोहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीमती .अंकिता खैरकर ( मते)  व वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन गोमसाळे , डॉ. जयरत्न , डॉ. इंगळे, डॉ. देशमुख यांचे सोबत सिस्टर इन्चार्ज श्रीमती स्नेहा शेवडे , सुजाता भुधे, श्रीमती उरभी वाणी सोबत रूग्णालयीन परिचारिका ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,औषध निर्माण अधिकारी ,तांत्रिक संवर्गातील कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले . यासाठी  मा. जिल्हाशल्य चिकित्सक सुहास माने , जिल्हा गुणवत्ता समन्वयक आणि डॉ . गुंजकर निवासी ,वैद्यकीय अधिकारी (व) तसेच डॉ. प्रसाद भंडारी यांनी विशेष मार्गदर्शन केले .

Comments

Popular posts from this blog