ब्राह्मण मंडळ रोहा अध्यक्षपदी अमित आठवले यांची निवड

| रोहा-निखिल दाते

ब्राह्मण मंडळ रोहाच्या अध्यक्षपदी समाजातील तरुण तडफदार कार्यकर्ते, प्रतिथयश व्यवसायिक श्री. अमित मनोहर आठवले यांची निवड करण्यात आली.

ब्राह्मण मंडळ रोहेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी श्री ओंकारेश्वर मंदिर येथे ज्येष्ठ विधीज्ञ हेमंत गांगल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

मंडळाचे मावळते अध्यक्ष हेमंत ओक, सचिव आनंद काळे यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले व कार्य अहवाल तसेच जमा खर्च ताळेबंद सभेसमोर सादर केला.

त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी ब्राह्मण मंडळ रोहाचे पदाधिकारी निवड करण्यात आली, यामध्ये अध्यक्षपदी अमित मनोहर आठवले, उपाध्यक्षपदी आनंद श्रीकृष्ण काळे, सचिवपदी निखिल माधव दाते, सह सचिवपदी मकरंद महादेव गोविलकर, खजिनदारपदी चैतन्य अनिल आठवले यांची निवड करण्यात आली.

नवीन कमिटीने सर्वांना सोबत घेत चांगले काम करावे असे आवाहन सभेचे अध्यक्ष ॲड. हेमंत गांगल यांनी नवनिर्वाचित कमिटीला केले.

जुन्या परंपरा व नव्या सुधारणा यांचा सुयोग्य संगम साधत ब्राह्मण मंडळ रोहेचे कामकाज पुढे नेण्याचा मनोदय नवनिर्वाचित अध्यक्ष अमित आठवले यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलतांना व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog