श्रीमती सुरेखा जंगम यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त 

कोलाड-श्याम लोखंडे 

रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील मौजे चिल्हे येथील श्रीमती सुरेखा विनायक जंगम यांचे बुधवार दिनांक ८ डिसेंबर रोजी आकस्मिक निधन झाल्याने जंगम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. चिल्हे गावासह  परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.मृत्यू समयी त्या ५७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता समजताच  रोहा तालुका व रायगड जिल्ह्यातील जंगम समाजबांधव व विविध स्तरातील समाजबांधव अंतिमदर्शनास उपस्थित होते. त्यांच्यावर चिल्हे येथील वैकुंठधाम स्मशानभुमीत  विधिवत पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेमळ व परोपकारी असणाऱ्या सुरेखाबाई ह्या मोठया कुटूंबातील होत्या.त्या महिला वर्गात मिळून मिसळून राहत असत.जंगम समाज व विविध समाजातील महिलांचा देखील त्या आदरपूर्वक सन्मान करत.पतीच्या पश्चात  त्यांनी मुलांवर चांगले संस्कार करून उच्च शिक्षण दिले. आज ते उच्चपदस्त आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी, सून, दिर,जावा,नणंद,पुतणे असा मोठा जंगम परिवार आहे .तसेच त्यांचे दुखवटा व पुढील क्रियाविधी दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजी त्यांचा राहत्या निवासस्थानी मौजे चिल्हे येथे होणार असल्याची माहिती कुटूंबीयांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog