साधना नायट्रो केमिकल्स लिमिटेड मध्ये रायगड जिल्हा इंडस्ट्रियल स्टाफ असोसिएशन या संघटनेच्या नामफलकाचे उद्धघाटन संपन्न
| धाटाव - प्रतिनिधी
प्रत्येक आस्थापनेमध्ये तेथील कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी संघटना कार्यरत असते. हि संघटना कर्मचारी वर्गाचे हित जोपासण्याबरोबरच कर्मचारी व व्यवस्थापन यामधील दुवा म्हणून काम करते.ह्या न्यायाने प्रत्येक कारखान्यात कामकार संघटना प्रभावीपणे काम करत आहेत.मात्र स्टाफ कर्मचाऱ्यांना कोणी वाली नव्हता.त्यामुळे व्यवस्थापनाने केलेल्या अन्याया विरूद्ध दाद कोठे मागावी? हा यक्ष प्रश्न स्टाफ कर्मचारी वर्गापुढे होता.अखेर स्टाफ युनियनने धाटाव एम.आय.डि.सी.मध्ये यशस्वी पदार्पण केले.
धाटाव एम.आय.डि.सी.मधील नावलौकिक असलेली साधना केमिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये 11 डिसेंबर 2021 रोजी रायगड जिल्हा इंडस्ट्रियल स्टाफ असोसिएशन (संलग्न भारतीय मजदूर संघ) या संघटनेच्या नामफलकाचे उद्धघाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या उद्धघाटन प्रसंगी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॕड.अनिल ढुमणे,रोहा तालुका कंत्राटी न्याय हक्क समिती अध्यक्ष श्री. सुरेश मगर,भारतीय मजदूर संघ जिल्हा चिटणीस श्री.अशोक निकम, भारतीय मजदूर संघ तालुका अध्यक्ष श्री.वैभव घाणेकर, भारतीय मजदूर संघ जिल्हा कोषाध्यक्ष श्री.संदिप मगर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
Comments
Post a Comment