धामणसई येथे शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य क्रिकेट सामने यशस्वीपणे संपन्न 

  रोहा-प्रतिनिधी

           शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य क्रिकेट सामने धामणसई ता.रोहा येथे पार पडले. या सामन्यांमध्ये  मुठवली, मालसई,धामणसई ,गावठण, सोनगाव,पिंगळसई या पंचक्रोशीतील गावांतील एकुण १२ संघांनी सहभाग घेतला होता. 

अंतिम सामना सोनगाव विरुध्द पिंगळसई ह्या संघामध्ये रंगला.या अंतिम सामन्यात श्री सोमेश्वर सोनगाव हा संघ विजयी झाल्याने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.तर द्वितीय क्रमांक GCC पिंगळसई व तृतीय क्रमांक GBC धामणसई यांनी पटकावला. सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाज विशाल जाधव (धामणसई), उत्कृष्ट गोलंदाज सुशांत शेडगे (पिंगळसई), स्पर्धेचे उत्कृष्ट खेळाडू रोहित चव्हाण (सोनगाव) यांना गौरविण्यात आले.रंगलेल्या अतीतटीच्या सामन्यात ज्याच्यामुळे सामन्याला टर्निंग पॉईंट मिळाला,त्या भूषण खांडेकर याला विशेष पुरस्कार देण्यात आला.तर विशेष कामगिरी निखिल जाधव,संकेत जंगम यांनी पार पाडली.सामने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वच संघांनी चांगला प्रतिसाद दिला.

         पंचक्रोशीतील शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन आयोजित स्पर्धेतील अंतिम विजेता सोनगाव संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog