रोहा वांगणी येथे अखंड हरीनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण 

          कोलाड - श्याम लोखंडे 

रोहा तालुक्यातील वांगणी येथे त्री तपपूर्ती सोहळ्यानिमित्ताने अखंड हरीनाम जप व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण मार्गशीर्ष शुद्ध पंचमी बुधवार दि.८ डिसेंबर २०२१ ते मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी शनिवार दि.११ डिसेंबर २०२१ पर्यंत श्री. मरीआई मंदिर येथे कार्यकमाचे आयोजन करण्यात येणार आहे.



            कोकणचे श्रद्धास्थान परमपूज्य स्वानंद सुख निवासी गुरुवर्य अलिबाकर महाराज व परमपूज्य स्वानंद सुख निवासी गुरुवर्य धोंडू महाराज कोल्हाटकर व गोपाळ बाबा वाजे यांच्या कृपा आशिर्वादाने गुरुवर्य ह.भ.प.दत्ताराम महाराज कोल्हाटकर श्री.क्षेत्र पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरीनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायणाचे आयोजन करण्यात येणार आहे.

                या निमित्ताने बुधवार दि.८/१२/२१ रोजी ह. भ.प.शेळके महाराज यांचे प्रवचन, ह. भ. प.दगडू महाराज दळवी (रायगड भुषण ) यांचे किर्तन,गुरुवार दि.९/१२/२१ रोजी ह.भ.प. अनिल महाराज शिंदे यांचे प्रवचन,ह.भ.प. रामदास महाराज पाटील (रायगड भुषण ) यांचे किर्तन,शुक्रवार दि.१०/१२/२१   रोजी ह. भ. प. गजानन महाराज बलकावडे यांचे प्रवचन,ह.भ.प. किरण महाराज कुंभार (रायगड भुषण )यांचे किर्तन,शनिवार दि.११/१२/२१सकाळी ९ते ११ ह.भ.प.गुरुवर्य दत्ताराम महाराज कोल्हाटकर (मठाधिपती श्रीक्षेत्र पंढरपूर ) यांचे काल्याचे किर्तन सेवा आयोजित करण्यात येणार असून  संध्याकाळी ५ ते ६ प्रवचन,सा.६ ते ७ हरिपाठ,रात्री ९.३० ते ११.३० किर्तन सेवा या वेळेत होणार असून या कार्यक्रमाला भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वांगणी ग्रामस्थ,महिला मंडळ, प्रभारी मंडळ ठाणे व मुंबई यांच्या कडून करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog