प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी अंतर्गत ३२६५४ नागरिकांनी घेतली कोरोना लस.

कोरोना लस न घेतलेल्यांसाठी आरोग्य विभागाचे जाहिर आवाहन 



कोलाड -श्याम लोखंडे 

  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लस देण्यास सुरुवात केली. रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी कोलाड येथे आजपर्यंत कोलाड परिसरातील ३२६५४ नागरिकांनी कोरोना वर मात करण्यासाठी ही लस घेतली असल्याची माहिती आरोग्य केंद्रातुन मिळाली आहे.

कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी शासनाच्या विविध योजना प्रशासकीय यंत्रणा राबवित आहेत.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील आरोग्य केंद्रात एकूण ३२६५४ डोस दिले गेले आहेत.यापैकी २२९०० पहिले तर ९७५४ दुसरे डोस दिले गेले आहेत.येथे अलिकडे  लसीची उपलब्धता होत असल्यामुळे नागरिकांनी कोरोना लसीच्या दुसऱ्या डोस पासून कोणीही वंचित राहू नये यासाठी कोलाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वरिष्ठ अधिकारी डॉ.वाघ,डॉ. तिवडे,डॉ.दर्शना वरूठे,तसेच सेविका सोनाली जांभळे यांनी आवाहन केले जात आहे.

सुरुवातीच्या काळात लसीचा तुटवडा होता परंतु आता कोणताही गडबड गोंधळ न होता येथील आरोग्य केंद्रात लसीकरण होत आहे. वेळोवेळी जिल्हा आरोग्य केंद्राकडून लसीचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना लस वेळेवर दिली जात असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे .

Comments

Popular posts from this blog