रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संचलित "खेलो इंडिया" अंतर्गत "जिल्हा कुस्ती केंद्राचा" शुभारंभ


अलिबाग-प्रतिनिधी

 रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, संचलित "खेलो इंडिया" या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत "जिल्हा कुस्ती केंद्राचे" सुरुवात स्वर्गीय भाऊ कुंभार कुस्ती संकुल, खोपोली येथे करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात मंजूर झालेल्या अवघ्या तीन कुस्ती केंद्रात खोपोलीच्या स्वर्गीय भाऊ कुंभार कुस्ती संकुलात कुस्ती केंद्र मंजूर करून कुस्तीगिरांचे भवितव्य घडविण्याचा संकल्प या निमित्ताने केला गेला. स्वर्गीय भाऊ कुंभार यांचे स्मरण करून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी त्यांच्याच नावे निर्माण झालेल्या संकुलात कुस्ती केंद्र सुरू करण्याचा अपूर्व योग आल्याबद्दल आपण भाग्यवान असल्याचे सांगून या योजने अंतर्गत जास्तीत जास्त निधी या ठिकाणी  आणण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे सांगितले. सदर खेलो इंडिया कुस्ती केंद्राचे भव्य उद्घाटन सर्व साहित्य व तयारी झाल्या नंतर माननीय ना. कू अदिती तटकरे, क्रीडा राज्य मंत्री तथा पालक मंत्री रायगड जिल्हा यांचे हस्ते करण्यात येणार आहे...राज्य क्रीडा प्रशिक्षक संदीप वांजळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, खोपोली शहरातील कुस्तीगीरांची संख्या पाहता, याच ठिकाणी कुस्ती केंद्र असावे असा आग्रह होता त्या नुसार प्रशासकीय पूर्तता करून हे केंद्र मंजूर झाल्याने येथून देशपातळीवर चांगले कुस्तीपटू निर्माण करण्याचा प्रयत्न होईल.


 खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी या कुस्ती केंद्राच्या माध्यमातून खोपोली शहराचे नाव या क्षेत्रात अधोरेखित होईल असा विश्वास व्यक्त केला. खोपोलीच्या उपनगराध्यक्षा विनिता कांबळे यांनी या कुस्ती केंद्रासाठी नगरपालिकेकडून शक्य तितकी मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला. नगराध्यक्षा सुमन ताई औसरमल यांनी खेलो इंडिया योजने अंतर्गत मंजूर झालेले कुस्ती केंद्र म्हणजे खोपोलीचा सन्मान असल्याचे सांगत या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाधिक खेळाडूंना प्राधान्य मिळेल याकडे आपलाही कटाक्ष असेल असे सांगत, सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव जगदीश महाराजचे आणि आभार प्रदर्शन कुस्ती प्रशिक्षक राजू कुंभार यांनी केले. या कार्यक्रमासाठी खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त मारुती आडकर, सुभाष घासे, क्रीडा प्रशिक्षक डॉ जयवंत माने, राजाबापू सगळगीळे, पद्माकर गायकवाड, हेमंत खाडे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर होते. या प्रसंगी बाल आणि युवा कुस्तीगीर आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांनी उपस्थिती दर्शवली होती.

Comments

Popular posts from this blog