"वरदा-सुनिल कन्यादान" योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी नंतर गोवे ग्रामपंचायतीचे महिला सक्षमीकरणासाठी पुढचे पाऊल

         ग्रामपंचायत क्षेत्रांतील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करण्यास आरंभकोलाड-प्रतिनिधी

रायगडचे खासदार श्री.सुनिल तटकरे,पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे,आमदार श्री. अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवे ग्रामपंचायत सरपंच श्री.महेंद्र पोटफोडे यांनी विविध उपक्रम राबविण्याचा धडाका लावला आहे.नुकतेच त्यांनी महत्वाकांक्षी "वरदा-सुनिल कन्यादान" योजनेचा शुभारंभ शिरवली गावी सौ.वरदाताई सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत केला.तर RO Water योजना,दिवाळी फराळ निर्मिती,गोधडी निर्मिती व तत्सम अनेक जनहिताच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी ग्रामपंचायत क्षेत्रात सुरु आहे.

 आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला स्वयंपूर्ण असाव्यात.त्यांनी गृहउद्योग सुरू करावेत यासाठी विविध व्यवसाय मार्गदर्शन व महिलांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत गोवे सरपंच श्री.महेंद्र पोटफोडे यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील मुठवली,शिरवली व गोवे गावांतील महिलांकारिता स्वयंरोजगार प्रशिक्षण सप्ताह आयोजित केला आहे.त्याचे उद्धघाटन रविवार दिनांक 12/12/2021 रोजी मूठवली येथे संपन्न झाले.

ह्या स्वयंरोजगार प्रशिक्षणात गोवे गावातील महिलांना मसाले बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.तर मुठवली गावातील महिलांना केक बनविणे व शिरवली गावातील महिलांना पापड बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.तयार उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम केले जाणार असल्याचे सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.

महिलांना पुरुषांबरोबरीचे स्थान असावे,महिला अर्थिकदृष्या सक्षम बनाव्यात ह्या उदात्त हेतूने खासदार श्री.सुनिलजी तटकरे,पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे,आमदार श्री.अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवे ग्रामपंचायत विविध उपक्रमांचे आयोजन करीत आहे.त्याच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन सरपंच श्री.महेंद्र पोटफोडे अविरत परिश्रम घेत आहेत.

          सदर कार्यक्रमांस उपसरपंच श्री.नितीन जाधव,ग्रामपंचायत सदस्या सौ.अंजली पिंपळकर,सौ.भावना कापसे,श्री.तानाजी मोरे,श्री.बाळकृष्ण भोसले,श्री. मधुकर कापसे,श्री.भरत कापसे,श्री.लवेश पिंपळकर, श्री.राकेश कापसे, श्री.पांडुरंग कापसे, श्री.चंद्रकांत कापसे व गोवे,शिरवली,मुठवली गावातील  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रशिक्षक म्हणून सौ.शालिका म्हात्रे या काम पाहणार आहेत.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अजय कापसे सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog