दिव जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबित झालेले अधिकारी पुन्हा सेवेत रुजू.

रोहेकरांचा संताप,तत्काळ बदली करा,रोहा सिटीझन फोरमची मागणी,रोहा तहसीलदारांना दिले निवेदन

रोहा तालुक्यात दिव जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबन करण्यात आलेले रोहा तहसील कार्यालयातील तत्कालीन नायब तहसीलदार सिराज तुळवे यांना पुन्हा रोहा तहसील कार्यालयात रुजू केले आहे. दिव येथील सरकारी जमीन परस्पर विक्री प्रकरणात तुळवे यांना दोषी ठरविण्यात आले होते. त्याच प्रक्रियेतून त्यांचे निलंबन झाले, हे आपल्याला ज्ञात आहे. त्यानंतर आपल्या अंतर्गत चौकशीनंतर तुळवे यांना पुन्हा रोहा तहसील कार्यलयातच कामावर रुजू केल्याने रोहा तालुक्यातील नागरिक कमालीचे आक्रमक झाले असून संताप व्यक्त करत आहेत त्यांची तात्काल येथून बदली करण्यात यावी या संदरबात रोहा तहसीलदार कविता जाधव यांना रोहा सिटीझन फोरम रायगडच्या वतीने ३ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी रोहा सिटीझन फोरम चे अध्यक्ष आप्पा देशमुख,नितीनशेठ परब ,उस्मानभाई रोहेकर,महेश सरदार आदी रोहेकरांनी रोहा तहसीलदार यांना निवेदन सादर केले. मात्र संबंध रोहा तालुक्यात त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे, आक्षेप आहे. सरकारी जमीन विक्री प्रकरणात दोषी ठरलेल्या व्यक्तीला पुन्हा रोहा तहसील कार्यालयात कामावर रुजू करावे हे सामाजिक न्यायदृष्ट्या आम्हा रोहेकरांना योग्य वाटत नसल्याने त्यांची तातकाल बदली करण्यात यावी असे निवेदन सादर केले असल्याचे सिटीझन फोरमचे रोहा तालुकाध्यक्ष आप्पा देशमुख यांनी सांगितले.

रोहेकरांना वेठीस धरणारे घोटाळेखोर अधिकारी यांची तातकाल उचलबांगडी करा -नितीन परब  

नायब तहसीलदार पदाचे अधिकारी सिराज तुळवे यांनी 342 एकर जमीन परस्पर विक्री घोटाळा केले असताना यांना सामान्यांच्या अत्यंत निगडीत पुन्हा पुरवठा विभागात कार्यरत केलेत हे अधिकच धक्कादायक आहे. तुळवे हे लोकांची कामे प्रामाणिकपणे करत नाहीत हे अनेकदा समोर आले आहे, प्रत्येक कामात सामान्यांना त्रास देतात, वेठीस धरतात,त्यांनी एजंटांची अख्खी फौज तयार अनेक केली आहे अशा तक्रारी असताना तूळवे यांना रेशन धान्य वाटप पुरवठा शाखा विभागात रुजू करावे हे निषेधार्थ आहेत. लोकांच्या मनात तूळवे यांच्या विषयी संशय आणि नाराजी आहे, त्यामुळे तुळवे यांची रोहा तहसील कार्यालयातून तातडीने बदली करावी अशी आमची न्याय्य मागणी आहे. सामान्यांच्या जमीन प्रकरणात गैरव्यवहार करणारे त्याहून करोडो रुपये किमतीची सरकारी खाजण जमीन परस्पर विकण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी सिराज तूळवे यांच्या बदलीच्या अर्जाची आपण दखल घ्याल अशी विनंती निवेदन रोहा तहसीदार ,प्रांताधिकारी,मुख्य जिल्हाधिकारी,पालकमंत्री व महसूलमंत्री यांना निवेदन दिले असून असे सामान्य नागरिकांना वेठीस धरणारे व घोटाळेखोर अधिकारी यांची तातकाल रोहा तहसील विभागातून उचल बांगडी करत येथून बदली करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog