रोटरी क्लबच्या माध्यमातून बोरगाव शाळेला संगणक संच भेट

कर्जत-सतिश पाटील

कर्जत तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ देवनार,युनिट बोरगाव यांच्या माध्यमातून जि.प.बोरगाव शाळेला २ संगणक संच भेट देण्यात आले. 

रोटरी क्लब ऑफ देवनार ही संस्था ग्रामीण भागात अविरतपणे समाजसेवेचे कार्य करत असते.कोरोना काळात आदिवासी बांधवाना अन्नधान्य, ब्लॅंकेट अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी आधुनिक शिक्षण पद्धती पासून वंचित आहेत, याकडे त्वरीत लक्ष केंद्रीत केले पाहिजे या विचारातून तालुक्यातील जि.प. बोरगाव शाळेला २ संगणक संच वाटप करण्यात आले.

या प्रसंगी रोटरी क्लब बोरगाव युनिट चे अध्यक्ष ज्ञानेश्वर खडेकर,उपाध्यक्ष प्रभाकर खडेकर,खजिनदार संजय पाटील,सदस्य धनंजय खडेकर,आकाश पाटील, एकनाथ चौरे, प्रशांत पाटील, तसेच महीला सदस्य शुभांगी खडेकर ,नंदिनी पाटील,अंजना धस, तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रणजित विशे सर ,प्रतिभा कोरडे मॅडम,तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog