रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा

बास्केटबाॕल संघाच्या राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील तीन मुलींची निवड

अलिबाग-प्रतिनिधी

रायगड जिल्हाच्या क्रीडा विश्वासाठी आनंदाची बातमी आहे.हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेकरिता महाराष्ट्र बास्केटबॉल संघाच्या पुणे येथे होणाऱ्या  राज्यस्तरीय निवड चाचणी करिता रायगडच्या तीन मुलींची निवड झाली आहे.

कु.भूमिका सर्जे,कु.मुस्कान सिंग,कु.स्नेहा यादव 

ह्या तीन मुली आपले नैपुण्य पणाला लावुन राज्याच्या संघात निवड होण्यासाठी मेहनत घेत आहेत.राज्य स्तरिय निवड चाचणीसाठी ह्या तिन्ही मुलींचे व त्यांचे प्रशिक्षक ओली व्हेली,प्रशिक्षक हरी किशन,सहाय्यक प्रशिक्षक  अश्विन जोस,टीम मॅनेजर अनिल जॉन यांचे विशेष अभिनंदन कृरण्यात येत आहे.

 आदिशक्ती न्यूज व रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांकडून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog