रोहा प्रेस क्लबतर्फे रोह्यात

 रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदात्यांनी सहकार्य करण्याचे आवाहनकोलाड - श्याम लोखंडे 

रोह्यातील क्रियाशील पत्रकारांची समाजसेवी संस्था रोहा प्रेस क्लब व कै.जनार्दन मारूती शेडगे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.३ डिसेंबर २०२१रोजी सकाळी१० ते सायं. ५.३० दरम्यान शासकिय विश्रामगृह दमखाडी येथे सालाबाद प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रोहेकरांनी या सामाजिक उपक्रमास नेहमीप्रमाणे आपले योगदान देऊन सहकार्य करावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

रोह्यातील एक दानशुर व्यक्तिमत्व आणि प्रेसफोटोग्राफर कै. जनार्दन शेडगे यांच्या स्मरणार्थ रोहा प्रेस क्लब व कै. जनार्दन शेडगे मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.कै.जनार्दन शेडगे यांनी त्यांच्या आयुष्यात रक्तदानाचे महत्व जाणुन सत्तरहुन अधिकवेळा रक्तदान करताना विशेषत: अत्यंत गरजेच्या वेळी रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचविले होते.कै.शेडगे यांच्या मृत्युपश्चात त्यांचा हा सामाजिक जाणिवेचा वारसा चालू ठेवण्याच्या उद्देशाने व त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन दरवर्षी त्यांचे मित्र मंडळ व येथील पत्रकारांची समाजसेवी संस्था रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून गेली १९ वर्षे या शिबिराचे आयोजन केले जात आहे. राज्य रक्तसंक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य आणि शासकिय रक्तपेढी अलिबाग यांच्या सहयोगातुन संपन्न होत असलेल्या या रक्तदान शिबिरास गेली अठरा वर्षे रोहेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी दिली आहे.                              

Comments

Popular posts from this blog