महिला सक्षमीकरणांतर्गत खांब विभागातील महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.

खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मिडियम स्कुलचा संयुक्त उपक्रम 


| कोलाड -श्याम लोखंडे

 रोहा तालुक्यातील खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड,श्री विवेकानंद रिसर्च र्अँन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा तसेच महाराष्ट्र शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)यांच्या संयुक्त विद्यमाने खांब विभागातील महिलांसाठी मसाले निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.महिलांच्या  सक्षमीकरणासाठी ह्या संयुक्त उपक्रमात विविध प्रकारचे  मसाले बनविण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शनिवार आणि रविवार या दोन दिवशी महिलांना देण्यात आले.सदरच्या प्रशिक्षणात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.



रोहा तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार  इंग्रजी शिक्षण देण्याचे काम खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल हि शैक्षणिक संस्था करीत आहे.शिक्षणाबरोबरच सामाजिक भावनेने प्रेरित होऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे व  मुख्याध्यापिका सौ. रिया लोखंडे यांच्या संकल्पनेतून परिसरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी,रोहा औद्योगिक क्षेत्रातील एक्सेल कंपनी व श्री विवेकानंद रिसर्च र्अँन्ड ट्रेंनिग दमखाडी रोहा यांच्या पुढाकाराने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.



 यावेळी श्री.हाशीराम ग. मंचेकर (Excel ind. HR & Admn.Head ) व सुशिल चं. रुळेकर ( Excel Ind CSR Head & VRTI Trust - रोहा प्रमुख ) प्रशिक्षण देणाऱ्या सौ मोरे व सौ.घोसाळकर,संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लोखंडे,मुख्याध्यापिका सौ.रिया लोखंडे,डॉ.श्याम लोखंडे ,गोविंद वाटवे,अनिल महाडिक,सौ. स्वाती महाडिक,डॉ.मंगेश सानप,रविंद्र मरवडे,शशिकांत मरवडे,नंदू कळमकर,अलंकार खांडेकर,विश्वास निकम आदि मान्यवर व प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .


रोहा पंचायत समितीच्या सदस्या सौ. सिद्धीताई संजय राजीवले यांनी सदिच्छा भेट देऊन प्रशिक्षणात सहभागी महिलांचे कौतुक केले.सर्व महिलांनी एकत्रीत येऊन कुटिरोद्योग व विविध उद्योग व्यवसायात पुढाकार घेतला पाहिजे,तुम्ही बनविलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.त्याचप्रमाणे एक्सेल कंपनी राबवत असलेला उपक्रम व त्यातून निर्माण होणारे महिला सक्षमीकरण हे कुटूंबाला आर्थिक बळ देणारे ठरणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
  रोहा तालुका कृषीअधिकारी श्री.महादेव करे यांनी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, तळागाळातील महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आर्थिकदृष्ट्या सक्षम बना.शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या,एकत्रित येऊन स्वयंरोजगार निर्माण करा.गृहउद्योग,व्यवसायासाठी शासनाची मदत घेऊन आपले कुटूंब आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न केले  पाहिजे.

तालुका कृषी अधिकारी श्री.महादेव करे यांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षणार्थी महिलांना शासनाच्यावतीने प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog