वीर हनुमान तिसे आयोजित  कबड्डी स्पर्धेत महाड संघ विजेता तर गोवे संघ उपविजेता 

मालसईचा ओंकार तेलंगे ठरला उत्कृष्ट चढाईपटू  


     | 
कोलाड - श्याम लोखंडे 

रोहा तालुक्यातील वीर हनुमान युवक मंडळ,गिरोबा मित्र मंडळ, तसेच ग्रामस्थ मंडळ तिसे यांच्या वतीने शनिवार दि.११ डिसेंबर व रविवार दि.१२ डिसेंबर २०२१ रोजी ५० किलो वजनी गटाचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  अटीतटीच्या कबड्डी स्पर्धेत ओवी स्पोर्ट्स महाड संघाने सोमजाई गोवे संघावर विजय संपादन करून विजेतेपद पटकावले.तर गोवे संघाने उपविजेते पटकावले.

             तिसे येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामांकित संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत गावदेवी बाहे संघ तृतीय तर भैरवनाथ मालसई संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ ठरला. 

    सोमजाई गोवे संघाचा प्रविण गायकवाड याला उत्कृष्ट पक्कडपटू म्हणून सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ट चढाईपटू म्हणून  भैरवनाथ मालसई संघाचा अष्टपैलु खेळाडू ओंकार तेलंगे याला गौरविण्यात आले.

सामनावीराचा 'किताब ओवी स्पोर्ट्स महाड संघाच्या आदित्य शिंदे याला देण्यात आला.

यावेळी तिसे ग्रामपंचायत सरपंच राकेश कांबळे,सदस्य महेश पवार,माजी सरपंच दगडू शिगवण,मुख्याध्यापक नितीन गोरीवले, विनोद कदम,विजय शिगवण ,नरेश बिरगावले,नागेश गोरीवले,मंगेश बिरगावले,ग्रामस्थ मंडळ तिसे व कब्बडीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog