रोहा बस स्थानकात स्व.दत्ताजीराव तटकरे यांच्या प्रतिमेचे अनावरण

पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरेंसह कार्यकर्त्यांची उपस्थिती

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची "चाणाक्य" म्हणून गणना केली जाते,त्या तटकरे कुंटूंबाची समाजकारणातुन मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्व.दत्ताजीराव तटकरेंचा आज ९४ वा जन्मदिन.त्यांच्या हयातीत त्यांनी जी दुरदृष्टी ठेवली आणि जे संस्कार केले त्याचे फलित आज त्यांच्या पश्चात संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे.पुत्र खासदार,नात राज्यमंत्री आणि नातु आमदार हे सारे ज्यांच्या आशीर्वादाने घडले त्यांना विनम्र अभिवादन करण्याचा आजचा दिन.

अतिशय प्रतिकुल परिस्थितीत  दत्ताजीरावांनी आपल्या गावातुन समाजकारणाला सुरूवात केली, त्यावेळी त्यांना प्रबळ असलेल्या मातब्बर विरोधकांचा निकराने सामना करावा लागला होता.त्यांचा हा समाजसेवेचा वारसा खासदार सुनिल तटकरे,राज्यमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे अखंडपणे चालवित आहेत.



   आज स्व.दत्ताजीरावांच्या ९४ व्या जयंती निमित्ताने आज रोहा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.यावेळी राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेतभाई तटकरे यांचेसह विजयराव मोरे,मधुकर पाटील,विनोदभाऊ पाशिलकर,नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,सुरेश मगर,राजेंद्र पोकळे,सुभाष राजे,मयुर दिवेकर,महेंद्र गुजर,राजेंद्र जैन,रविंद्र चाळके,नंदकुमार म्हात्रे,अनंत देशमुख,अमित मोहिते,मयुर खैरे,संतोष भोईर,नवनित डोलकर,किरण मोरे,उत्तम नाईक,रविना मालुसरे,श्रुतिका जैन,रोहा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक व राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      स्व.दत्ताजीराव तटकरे (आण्णा) यांना आदिशक्ती न्यूजची भावपुर्ण आदरांजली

Comments

Popular posts from this blog