रोहा प्रेस क्लबच्या रक्तदान शिबिरास  उत्स्फूर्त प्रतिसाद

        १३१ रक्तदात्यांनी केले रक्तदानकोलाड - श्याम लोखंडे

रोह्यातील दानशूर व्यक्तिमत्त्व, प्रेस फोटोग्राफर कै, जनार्दन शेडगे यांच्या स्मरणार्थ रोहा प्रेस क्लब व कै, जनार्दन शेडगे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 131 पिशव्या रक्त जमा करण्यात आले. कै.जनार्दन शेडगे यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा रक्तदान करून रूग्णांचे प्राण वाचवले होते. ती भावना कायम ठेवण्याच्या उद्देशाने रोहा प्रेस क्लबच्या वतीने गेली 18 वर्षं रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे.

शिबिराच्या प्रारंभी कै. जनार्दन शेडगे यांना मंडळाचे अध्यक्ष अरूण करंबे, दिलीप वडके, राजेंद्र जाधव यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, रोहा तालुका सिटीझंस फोरमचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक आप्पा देशमुख, अॕड. मनोजकुमार शिंदे, महेश सरदार, संदीप सरफळे, उस्मानभाई रोहेकर, आप्पा शेडगे, राजेश काफरे, आदिं मान्यवर उपस्थित होते. प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने, पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहा. पो. नि. ठाकरे, विजयराव मोरे, विनोदभाऊ पाशीलकर, अनंतराव देशमुख, अमित घाग, शैलेश रावकर आदींसह औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे व्यवस्थापक, रोह्यातली प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व समाजसेवी संस्थानी सदिच्छा भेट दिली.


शिबिरासाठी रायगड प्रेस क्लब उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, रोहा प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत मोरे, माजी अध्यक्ष उदय मोरे, महेश बामुगडे, उपाध्यक्ष अल्ताफ चोरडेकर, सुहास खरीवले, नरेश कुशवाह, श्याम लोखंडे, कल्पेश पवार,रविंद्र कान्हेकर, शरद जाधव, समिधा अष्टिवकर,सचिन शेडगे, विश्वजित लुमण,रविना मालुसरे,अंजुम शेटे, दिनेश जाधव, सिद्देश ममाले, सचिन साळुंखे, उद्धव आव्हाड, अमित कासट आदींसह प्रेस क्लब व शेडगे मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या आयोजनासाठी शासकीय रक्तपेढीचे डाॅ दीपक गोसावी व त्यांच्या टीमने सहकार्य केले.मराठीपत्रकार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिनानिमित्त आपले मार्गदर्शक, मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख साहेब यांच्या आदेशाने रोहा प्रेस क्लब व जाधव नर्सिंग होम चे डॉ अशोक जाधव यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने 3 डिसेंबर 2021 रोजी शासकीय विश्रामगृह रोहा येथे सर्व पत्रकारांना एकत्र घेऊन रोहा प्रेस क्लबचे प्रमुख मार्गदर्शक मिलिंद अष्टीवकर,राजेंद्र जाधव  व अध्यक्ष शशिकांत मोरे  यांच्या नेतृत्वाखाली मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने प्रेस क्लबचे सर्व सदस्य व पत्रकार उपस्थित होते.कोरोना संकटात शासकीय स्तरावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. दरम्यान गेल्या तीन महिन्यात रोहयात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काही ब्लड कॅम्प झालेले आहेत. तरीही या शिबिरास रक्त दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिले. रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी रक्तदात्यांचे, सहयोगी सेवाभावी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog