मालसई येथे अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न
आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी मनोभावे घेतले दर्शन
| रोहा-प्रतिनिधी
वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या रोहा तालुक्यातील मालसई येथे दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मार्गशीर्ष शुद्ध नवमी दिनांक 12 डिसेंबर 2021 ते 15 डिसेंबर 2021 रोजी विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये संपन्न झाला. श्री संत अलिबागकर बाबा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ह.भ.प. गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे, ह.भ. प. धोंडू बाबा कोल्हटकर यांच्या कृपाछत्राखाली ह.भ.प.गुरुवर्य नारायण दादा वाजे, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, ह.भ.प.सखाराम महाराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वशांती नामयज्ञ,अखंड हरिपाठ,ज्ञानेश्वरी पारायण पार पडले.
काकडा आरती दररोज पहाटे ५ ते ६ त्यानंतर ९ ते ११ व दुपारी २ ते ४ ज्ञानेश्वरीचे पारायण,किर्तन,भजन,महाप्रसाद असे नित्य कार्यक्रम असत.ह.प.भ.दिनेश महाराज कडव, ह. प.भ. राम महाराज सावंत, ह.भ. प.पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे ४ ते५ प्रवचन होते.
सायंकाळी ५ते ६ हरिपाठ व ७ ते ९ कीर्तन झाल्यानंतर विठ्ठल नामाचा जागर भजन होत असे.किर्तनकार ह.भ.प.नारायण दादा वाजे,ह.भ.प. नित्यानंद महाराज मांडवकर, ह. भ.प .पुरुषोत्तम महाराज पाटील, ह.भ.प.सखाराम महाराज निकम, ह.भ.प.दिनेश महाराज कडव यांचे सुश्राव्य किर्तन होते.किर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच रोहा तालुक्यातील अनेक भाविकांची उपस्थिती लाभली.
मोक्षदा एकादशी व गीता जयंती निमित्ताने श्रीमद भग्वदगीतेच्या अठरा अध्यायांचे पारायण करण्यात आले.दिनांक 15 डिसेंबर रोजी ह.भ.प दिनेश महाराज कडव यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
दिनांक 15 डिसेंबर रोजी पालखी सोहळ्यानिमित्ताने आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात उपस्थित राहून श्री विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी वारकरी संप्रदायातील किर्तनकारांना त्यांनी वंदन केले.तसेच सोहळा आयोजक ग्रामस्थांबरोबर सुसंवादही साधला.
पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.पालखी सोहळा अवर्णणीय असा होता,अबालवृध्दांनी भान हरपुन विठ्ठल नामाच्या गजरावर ठेका धरला होता. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी धामणसई पंचक्रोशी वारकरी संप्रदाय,मालसई ग्रामस्थ,महिला मंडळ,युवक-युवती तसेच पंचक्रोशीतील भाविकांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment